सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:48 IST)

धोनीची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पद्मभूषण पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमताने  शिक्कामोर्तब केल्याचे बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी सांगितले. पद्म पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी केवळ एकाच क्रिकेटपटूचे नाव पाठवण्यात आले आहे.  

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक ( २००७ मध्ये टी-२०, २०११मध्ये वन-डे ) जिंकले आहेत. सध्या तो बऱ्याच काळानंतर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे मध्ये तडाखेबाज फलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. त्याचबरोबर तो  वन-डेमध्ये १०,००० धावांचा टप्पा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे.