वयाच्या 29 व्या वर्षी क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन,क्रिकेट जगात शोककळा

Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (12:52 IST)
भारतीय अंडर -19 संघाचे माजी कर्णधार अवि बरोट यांचे वयाच्या29 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सौराष्ट्र क्रिकेट बोर्डाने (एससीए) त्याच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांनी हरियाणा आणि गुजरातचेही प्रतिनिधित्व केले होते आणि यावर्षी त्यांनी टी -20 क्रिकेटमध्ये तुफानी शतक झळकावले. 2019-20 च्या हंगामात रणजी करंडक जिंकणाऱ्या सौराष्ट्र संघाचे ते सदस्य होते,त्यांनी बंगालला पराभूत करून विजेतेपद पटकावले. त्यांनी सौराष्ट्रसाठी 21 रणजी ट्रॉफी सामने, 17 लिस्ट-ए आणि 11 घरगुती टी -20 सामने खेळले. एससीएचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी अवि बरोट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, "सौराष्ट्र क्रिकेट संघातील प्रत्येकजण सौराष्ट्रातील प्रख्यात क्रिकेटपटू अवि बरोट यांच्या अकाली निधनाने दु: खी आहे. हृदयविकाराच्या झटक्याने 15 ऑक्टोबर 2021 च्या संध्याकाळी त्यांचे निधन झाले.


माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरसह अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 2011 मध्ये ते बीसीसीआयचे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते.
अवी बारोटने या वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली करंडकात 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 53 चेंडूत 122 धावांचे शतक केले. या उत्कृष्ट डावाच्या जोरावर संघाने 215 धावा केल्या होत्या. सौराष्ट्रने हा सामना 90 धावांनी जिंकला. त्यांच्या अकाळी निधनाने संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

MI vs SRH IPL 2022: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 3 ...

MI vs SRH IPL 2022: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 3 धावांनी पराभव केला, प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2022 चा 65 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई ...

MI vs SRH: सलग पाच सामने हरलेल्या हैदराबादच्या संघासाठी ...

MI vs SRH: सलग पाच सामने हरलेल्या हैदराबादच्या संघासाठी विजय आवश्यक
सनरायझर्स हैदराबाद संघाला मागील पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी ...

IPL 2022, PBKS vs DC : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 ...

IPL 2022, PBKS vs DC : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 धावांनी पराभव केला
IPL 2022, PBKS vs DC : IPL 2022 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा ...

RR vs LSG: लखनौचे फलंदाज पुन्हा अपयशी,राजस्थानने विजय ...

RR vs LSG: लखनौचे फलंदाज पुन्हा अपयशी,राजस्थानने विजय मिळवला,गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला
राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 24 धावांनी शानदार विजय नोंदवला. मुंबईच्या ...

CSK vs GT: हार्दिकच्या टीमचा बदला घेणार धोनीचा सुपर किंग्स, ...

CSK vs GT: हार्दिकच्या टीमचा बदला घेणार धोनीचा सुपर किंग्स, गुजरात जिंकला तर टॉप टू मध्ये स्थान निश्चित
IPL 2022 च्या 62 व्या सामन्यात, आज चार वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध ...