1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 17 जून 2025 (17:34 IST)

Ahmedabad Air India plane crash इंग्लंडला जाणाऱ्या क्रिकेटर दिर्ध पटेलच्या निधनाबद्दल संघाने शोक व्यक्त केला

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच, २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 एका भयानक अपघातात कोसळले. विमान मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये कोसळले. या अपघातात २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि चमत्कारिकरित्या फक्त एकच जण वाचला. हा देशातील सर्वात भयानक विमान अपघातांपैकी एक मानला जातो.
 
मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय क्रिकेटर दीर्घ पटेलचाही या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश होता. तो मूळचा गुजरातचा होता. तो इंग्लंडमधील लीड्स मॉडर्नियन्स क्रिकेट क्लबशी संबंधित होता आणि २०२४ मध्ये एअरडेल आणि व्हार्फेडेल सीनियर क्रिकेट लीगमध्ये क्लबकडून खेळला. दिर्धाने २०२४ च्या हंगामात क्लबच्या पहिल्या संघासाठी २० सामने खेळले, ३१२ धावा केल्या आणि २९ विकेट्स घेतल्या. इंग्लंडमध्ये नोकरी मिळाल्यानंतर तो "ओव्हरसीज बॉर्न इंग्लिश रेसिडेंट" खेळाडू म्हणून नोंदणी करण्याची योजना आखत होता. पण अहमदाबाद एयर इंडिया विमान अपघातात दिर्धचे निधन झाले. 
 
क्लबने असेही जाहीर केले आहे की या आठवड्याच्या शेवटी त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या संघाच्या सामन्यापूर्वी एक मिनिट मौन पळाले जाईल. लीग आयोजकांनी दिर्धचा भाऊ कृतिक पटेल आणि संपूर्ण पटेल कुटुंबासोबतही त्यांच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे.
Edited By- Dhanashri Naik