1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Gang rape of a girl on the Gopalpur beach

समुद्रकिनाऱ्यावर तरुणीवर सामूहिक बलात्कार; ७ आरोपींना अटक

crime
ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपालपूर समुद्रकिनाऱ्यावर रविवारी रात्री एका २० वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराच्या समोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. माहिती समोर आली आहे की, १० आरोपींनी पीडितेच्या प्रियकराचे हात-पाय बांधले आणि नंतर त्याच्यासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ आरोपींना अटक केली आहे.
तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की ती तिच्या प्रियकरासह गोपालपूर समुद्रकिनाऱ्यावर एका निर्जन ठिकाणी बसली होती, त्याच वेळी ३ मोटारसायकलींवर १० जण आले आणि त्यांनी तरुणीच्या प्रियकराला पकडले आणि त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर, सर्वांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना रविवारी रात्री घडली. अशी माहिती समोर आली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी प्रथम त्यांचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. नंतर सर्वांनी एकामागून एक मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवले. तसेच घटनेनंतर पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसह गोपाळपूर पोलिस ठाण्यात पोहोचली आणि तिच्यासोबत घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने कारवाई करत ७ आरोपींना अटक करण्यात आली. पोलिस आरोपींची चौकशी करत आहे आणि पीडितेची आणि आरोपींची वैद्यकीय तपासणी देखील केली जात आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
Ahmedabad Air India plane crash इंग्लंडला जाणाऱ्या क्रिकेटर दिर्ध पटेलच्या निधनाबद्दल संघाने शोक व्यक्त केला