वीज कोसळून तीन अल्पवयीन मुलांसह १० जणांचा मृत्यू
Odisha News: ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून तीन अल्पवयीन मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहे, ज्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ओडिशामध्ये कालबैसाखी वादळासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे जनजीवनावर गंभीर परिणाम झाला.
विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलांसह किमान १० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Edited By- Dhanashri Naik