बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (08:27 IST)

क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील अखेर सापडले

Kedar Jadhavs father is Mahadev Jadhav found
क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे संध्याकाळी मुंढवा पोलीस ठाण्याजवळ सापडले. पोलीस दलातील पाच पथकांकडून महादेव जाधव यांचा शोध घेण्यात येत होता. ते सापडल्यानंतर केदार जाधव याने पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांना आपल्यासोबत नेले.
 
 केदार जाधव याचं कुटुंब पुण्यातील  कोथरूड भागात राहायला आहे. त्याचे वडील महादेव जाधव हे आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रिक्षाने गेले.  मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत होता. त्यामुळे चिंतातूर झालेल्या जाधव कुटुंबीयांनी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor