शनिवार, 27 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (09:13 IST)

दीपक हुड्डाचं शतक, भारताचं आयर्लंडवर निर्भेळ विजय

India Vs Ireland
दीपक हुड्डाच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 225 धावांचा डोंगर उभारला. दीपकने 9 चौकार आणि 6 षटकारांसह 57 चेंडूत 104 धावांची मॅरेथॉन खेळी केली. ट्वेन्टी20 प्रकारात भारतासाठी शतक झळकावणारा दीपक केवळ चौथा फलंदाज ठरला. 
 
संजू सॅमसनने 42 चेंडूत 77 धावांची खेळी करत दीपकला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली. आयर्लंडकडून मार्क अडेरने 3 तर जोश लिटील आणि क्रेग यंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडने 221 धावांची मजल मारली. अँडी बलर्बिनीने 60 तर पॉल स्टर्लिंगने 40 आणि हॅरी टेक्टरने 39 धावांची खेळी केली. दीपक हुड्डाला सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीय संघाने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.