शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (19:06 IST)

जडेजाचे पत्नीसोबत देवदर्शन

ravindra jadeja
Twitter
भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज संघांत कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळल्या जाणार आहेत. यापैकी कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघांत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा संधी देण्यात आली आहे. सध्या रवींद्र जडेजा सुट्टीवर आहे.
 
दरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत आशापुरा मातेच्या दर्शनासाठी पोहोचला आहे, ज्याचा फोटो त्याच्या पत्नीने ट्विटरवर शेअर केला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर रवींद्र जडेजा ब्रेकवर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. याआधी तो कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.