रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (10:41 IST)

Pune: डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वतःला संपवलं

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंडच्या वरवंड येथे एका डॉक्टरने आपल्या पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर असे या मयत डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी पत्नी पल्लवी अतुल दिवेकर,मुलगी वेदान्तिका आणि मुलगा अदत्विक यांची हत्या केली. नंतर स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिट्ठी आढळली आहे. अतुल दिवेकर हे वरवंड भागात चैताली पार्क परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. मंगळवारी दुपारच्या वेळी त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीने दार ठोठावले. आतून कोणताही प्रतिसाद आला नाही.त्याने खिडकीतून डोकावून पहिले असता त्यांना अतुलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला त्याने आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले. त्यांनी दार खोलून बघता अतुलच्या पत्नीचे मृतदेह जमिनीवर आढळले. घटनास्थळी चिट्ठी सापडली असून त्यात मी पत्नीची गळा आवळून हत्या करून दोन्ही मुलांचा विहिरीत टाकून खून केला. मी स्वतः आत्महत्या करत आहो असे लिहून ठेवले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. डॉक्टरांनी असे पाऊल का घेतले याचा अद्याप शोध लागला नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit