शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: वाराणसी , सोमवार, 25 जानेवारी 2021 (16:00 IST)

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सध्या अडचणीत सापडला आहे. वाराणसीत नावेतून फिरताना पक्ष्यांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 
देशभरात विविध शहरात बर्ड फ्लूचे सावट आहे. बर्ड फ्लूचे संकट असताना पक्ष्यांना हाताळणे किंवा त्यांच्या संपर्कात येणे टाळावे असे प्रशासनाने बजावले आहे. असे असताना धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्याने त्याच्यावर कारवाईची शक्यता  आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर ते लगेच व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या फोटोनंतर स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, धवनवर कारवाई होऊ शकते. प्रशासन यावर गंभीर  विचार करत आहे.
 
धवन वाराणसीत मुक्कामी आहे. यावेळी त्याने बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. तसेच गंगा आरतीही केली.