1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (16:05 IST)

लाइव्ह मॅच दरम्यान PAK क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी खोटी! खेळाडू म्हणाला - मी ठीक आहे

Usman Shinwari:
Usman Shinwari: अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि काही बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ज्यांच्याबद्दल असा दावा केला जात होता की पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान शिनवारीचा मृत्यू थेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने झाला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खेळाडू मैदानावर मॅच खेळत आहेत पण अचानक सगळेजण बाजूला पळू लागले. यानंतर, व्हिडिओमध्ये एक खेळाडू जमिनीवर उलटा पडलेला दिसत आहे. ज्याच्या आसपास खेळाडू आणि इतर काही लोक आहेत.
 
सामन्यादरम्यानच उस्मान शिनवारीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला वाचवता आले नाही, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. वृत्तानुसार, पाकिस्तान कॉर्पोरेट लीग अंतर्गत हा सामना 25 सप्टेंबर रोजी लाहोरमधील प्रसिद्ध ज्युबली क्रिकेट मैदानावर खेळला जात होता. बर्जर पेंट्स आणि फ्रिजलँडचे संघ या सामन्यात आमनेसामने होते. ही घटना घडली तेव्हा बर्जर पेंट्सची बॅटिंग सुरू होती. त्यानंतर मैदानावरील फ्रिजलँडचा क्षेत्ररक्षक (उस्मान शिनवारी) जमिनीवरच खाली पडला.
 
जेव्हा ही बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत गेली, तेव्हा वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारीने सोशल मीडियावर अफवा खोडून काढल्या आणि ट्विट केले की, "मी ठीक आहे, माझ्या कुटुंबाला माझ्या मृत्यूबद्दल कॉल येत आहेत. न्यूज चॅनेल पूर्ण आदराने, कृपया एवढी मोठी बातमी चालवण्याआधी ती सत्यापित करून घ्यावी.  धन्यवाद."