सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2022 (20:02 IST)

ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू  लेगस्पिनर शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल फॉक्स स्पोर्टच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न थायलंडमध्ये होते आणि तेथे त्यांचा अचानक संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. क्रिकेट इतिहासातील महान लेग-स्पिनर मानले जाणारे  ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेट पटू  शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट घेतले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ होत आहे.