गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2022 (19:28 IST)

एमएस धोनीचा नवा लूक चाहत्यांना आश्चर्यात टाकणारा

एमएस धोनी हे  अजूनही आयपीएलचे  दिग्गज खेळाडू मानले जातात. यावेळी धोनी आयपीएल 2022 मध्ये नव्या रुपात दिसणार आहे. त्यांचा नवा लूक व्हायरल झाला आहे. हे पाहून चाहते खूप खुश दिसत आहेत.
 
 IPL 2022 26 मार्चपासून सुरू होत आहे. धोनीने त्यांच्या  नेतृत्वाखाली 4 वेळा चेन्नई सुपर किंग्जला T20 लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे. CSK चा संघ या स्पर्धेचा गतविजेता देखील आहे. अशा परिस्थितीत धोनीचा मिशीचा लूक सर्व चाहत्यांना आवडला आहे. धोनीच्या नव्या लूकबद्दल सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. लोक आपापल्या शैलीत प्रतिक्रिया देत आहेत.