सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (11:31 IST)

गौतम गंभीरचा आरोप, 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याच्या धमक्या

माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने आरोप केला आहे की, दहशतवादी संघटना ISIS काश्मीरकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबाबत गौतम गंभीरने दिल्ली पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे. डीसीपी श्वेता चौहान यांनी सांगितले की, तिच्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. गंभीरच्या निवास स्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.