एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज पुन्हा अव्वल, स्मृती मंधाना टी -२० मध्ये करिअरच्या सर्वोत्कृष्ट तिसर्या स्थानावर आहे
भारतीय कर्णधार मिताली राजने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (ICC) ताज्या महिला वनडे फलंदाजी क्रमवारीत 762 गुणांसह अव्वल स्थान गाठले. स्मृती मंधानाचा देखील नवव्या स्थानासह पहिल्या दहामध्ये समावेश आहे. मिताली 16 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी प्रथमच फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठल्यानंतर 9 व्या वेळी प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरली आहे. मागील क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणारी वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलर पाचव्या स्थानावर घसरली आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेनंतर क्रमवारीत सुधारणा करण्यात आली आहे. टेलरने 30 गुण गमावले आहेत.
गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी पाचव्या क्रमांकासोबत शीर्ष 10मध्ये सामील एकमेव भारतीय गोलंदाज आहे, तर दीप्ती शर्मा अष्टपैलू क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहेत. महिला टी -20 आंतरराष्ट्रीय खेळाडू रँकिंगमध्ये भारतीय सलामीवीर मंधाना तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंगच्या बरोबरीने तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या आणि अंतिम टी -२० सामन्यात तिने 70 धावा केल्या होत्या, जे गेल्या आठवड्यात तिचा हा एकमेव सामना होता.
टेलरला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला
मंगळवारी झालेल्या साप्ताहिक अपडेटमध्ये वेस्ट इंडिजची कर्णधार टेलरला 30 गुणांचा तोटा सहन करावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजने पाकिस्तानला 3-2 असे पराभूत केले. साप्ताहिक क्रमवारीत टेलरला तिनापैकी दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. तिने 49 आणि 21 धावा केल्या. मालिकेच्या पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळीसह गेल्या आठवड्यात एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळविणाऱ्या टेलरनेदेखील ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान गमावले आहे. टेलरला तीन सामन्यांत कोणतेही बळी मिळू शकले नाहीत, त्यामुळे अष्टपैलूंच्या यादीत तीही तीन स्थानांवर घसरली आहे.