रविवार, 29 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (10:14 IST)

IND vs AFG: विराट कोहलीने 29 धावा करून इतिहास रचला

virat kohli
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित आणि कंपनीने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या स्फोटक खेळीमुळे टीम इंडियाने 15.4 षटकात 173 धावांचे लक्ष्य गाठले. 14 महिन्यांनंतर T20 मध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात 16 चेंडूत 29 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार मारले. या खेळीसह विराटने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला.
 
29 धावांच्या डावात 17 धावा केल्यानंतर विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना दोन हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने ही कामगिरी केली होती. स्टर्लिंगने टी-20 मध्ये 83 डावात 2074 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना 46 डावात 2012 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
 
T20 तसेच ODI मध्ये पाठलाग करताना 2000+ धावा करणारा विराट हा जगातील पहिला खेळाडू आहे. वनडेत लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने 152 डावांमध्ये 65.49 च्या सरासरीने 7794 धावा केल्या आहेत. यामध्ये 27 शतके आणि 40 अर्धशतके आहेत. वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 232 डावात 42.33 च्या सरासरीने 8720 धावा केल्या आहेत. यामध्ये 17 शतके आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.
 
भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत सर्व गडी गमावून 172 धावा केल्या.प्रत्युत्तरात भारताने 15.4 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहित सलग दुसऱ्या टी-२०मध्ये खातेही न उघडता बाद झाला. त्याचवेळी 14 महिन्यांनंतर टी-20मध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने 16 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 29 धावांची खेळी केली. 
 
Edited By- Priya Dixit