शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2023 (17:23 IST)

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ICC ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनला, भारताचा पराभव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाकडून 209 धावांनी पराभव झाला आहे. कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी अर्धा दिवसही भारतीय फलंदाजांना सामन्यात टिकाव धरता आला नाही. या विजयासह, ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा आणि ट्रॉफीवर कब्जा करणारा पहिला संघ ठरला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला आहे.
 
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का दिला. त्याने उस्मान ख्वाजाला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. ख्वाजाला खातेही उघडता आले नाही. दोन धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने मार्नस लॅबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. उपाहारापूर्वी वॉर्नरला शार्दुल ठाकूरने यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद केले. तो 60 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 43 धावा करून बाद झाला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून 73 धावा केल्या होत्या.
 
ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा आणि ट्रॉफीवर कब्जा करणारा पहिला संघ ठरला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला आहे.
 
Edited by - Priya Dixit