सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (07:32 IST)

IND vs AUS :भारता कडून ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव,मालिकेत 2-0 अशी आघाडी

IND vs AUS :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना भारताने 44 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिरुवनंतपुरममध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गडी गमावून 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 191 धावा करू शकला आणि सामना गमावला.
 
भारताने दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत चार विकेट्सच्या मोबदल्यात 235 धावा केल्या होत्या. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यशस्वी जैस्वालने 53, ऋतुराज गायकवाडने 58 आणि इशान किशनने 52 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने नऊ चेंडूत 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.
 
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली आणि दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या 30 धावांपर्यंत पोहोचली. मात्र, शॉर्ट 19 धावा करून बाद झाला आणि कांगारू संघ रुळावरून घसरला. इंग्लिश दोन धावा करून बाद झाला आणि मॅक्सवेल 12 धावा करून बाद झाला. 
स्मिथही 19 धावा करून बाद झाला. स्टॉइनिस आणि डेव्हिडने अर्धशतकी भागीदारी करून संघात पुनरागमन केले, पण डेव्हिड बाद झाल्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. डेव्हिडने 37 आणि स्टॉइनिसने 45 धावा केल्या. शेवटी मॅथ्यू वेडने नाबाद 42 धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियन संघ नऊ गडी गमावून 191 धावाच करू शकला. भारताकडून प्रसीध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
 
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 गडी गमावून 235 धावा केल्या. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यशस्वी जैस्वालने 53, ऋतुराज गायकवाडने 58 आणि इशान किशनने 52 धावा केल्या. 
 
Edited by - Priya Dixit