IND vs AUS T20 : ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर, कट ऑफ वेळ रात्री 9.46 वाजता,अन्यथा सामना रद्द
IND vs AUS T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज नागपुरात खेळवला जात आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरो आहे. भारतीय संघ हरला तर मालिका गमवावी लागेल. पहिल्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा चार विकेट्सने पराभव केला.
8 वाजता पंचांनी पुन्हा मैदानाची पाहणी केली. जमिनीचा काही भाग अजूनही ओला असून तो कोरडा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे हा परिसर ओला झाला असून तो खेळाडूंसाठी सुरक्षित नसल्याचे पंचांनी सांगितले. आम्ही अजूनही ते कोरडे होण्याची वाट पाहत आहोत. ग्राउंड स्टाफ त्यांचे काम करत आहे.
पंचांनी सांगितले की राज 9:46 वाजता कट ऑफ टाइम आहे. तोपर्यंत सामना सुरू झाल्यास पाच षटकांचा खेळ केला जाईल. जर सामना 9.46 पर्यंत सुरू होऊ शकला नाही, तर सामना रद्द केला जाईल. रात्री 8.45 वाजता पंच पुन्हा मैदानाची पाहणी करतील. त्यानंतर काही निर्णय घेतला जाईल. मात्र, आता षटके कापली जातील. किती षटकांचे सामने खेळवले जाऊ शकतात हे पाहणे मनोरंजक असेल.