सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (16:36 IST)

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडने भारताच्या हातून विजय हिसकावला, कसोटी मालिकेतील पहिला सामना ड्रॉ राहिला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळली गेलेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली. टीम इंडियाला कानपूर कसोटी जिंकण्याची चांगली संधी होती, पण ते विजयापासून एक विकेट दूर राहिले. एजाज पटेल आणि रचिन रवींद्र ही जोडी 52 चेंडूत विकेटवर उभी राहिल्याने टीम इंडियाचा विजय हुकला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावा करायच्या होत्या, पण संघाला 9 गडी गमावून 165 धावाच करता आल्या. भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने चार आणि आर अश्विनने तीन बळी घेतले. या दोघांशिवाय अक्षर पटेल आणि उमेश यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.