गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (11:08 IST)

IND vs NZ :वेलिंग्टनमध्ये भारताचा युवा संघ आणि न्यूझीलंडचा सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून (18 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. वेलिंग्टनमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारताला इंग्लंडविरुद्ध आणि न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडिया आणि किवी टीम तो पराभव विसरून नव्याने सुरुवात करावी लागणार  
 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी सामना वेलिंग्टन येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 12.00 वाजता होणार आहे
 
T20 विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत छाप पाडण्यासाठी उत्सुक असेल. भारतीय संघाने गेल्या दोन वर्षांत टी-२० फॉरमॅटमध्ये दोन विश्वचषक खेळले आहेत.गेल्या नऊ वर्षांपासून संघाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. भारतीय संघ येथे तीन T20 सामने खेळणार आहे आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आणखी नऊ सामने खेळणार आहे.
 
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात इशान किशन आणि शुभमन गिल सलामीला जाऊ शकतात पण व्यवस्थापन ऋषभ पंतला क्रमवारीत आणखी एक संधी देऊ शकते.
 
संभाव्य प्लेइंग 11
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
 
भारत: शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा/वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
 
Edited By - Priya  Dixit