शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (12:33 IST)

IND vs NZ: श्रेयस अय्यरने एकदिवसीय सामन्यात सलग चौथ्यांदा 50+ धावा करत विक्रम केला

Shreyas Iyer
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 7 गडी गमावून 306 धावा केल्या. कर्णधार शिखर धवनने 72 आणि शुभमन गिलने 50 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. 
 
भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 76 चेंडूत 80 धावांची खेळी खेळली. श्रेयसने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 105.26 होता. ही इनिंग खेळण्या सोबतच श्रेयसने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. 

न्यूझीलंडच्या भूमीवर वनडे मधली ही त्याची सलग चौथी 50+ डाव होती. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. श्रेयसने यापूर्वी 107 चेंडूत 103 धावा, 57 चेंडूत 52 धावा, 63 चेंडूत 62 धावा केल्या होत्या. 2020 मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर त्याने हे तीन डाव केले. 
 
 न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या संघाच्या फलंदाजाने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. त्याच्या आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाने ही कामगिरी केली होती. श्रेयसने आता रमीझ राजाची बरोबरी केली आहे. रमीझने न्यूझीलंड दौऱ्यावर वनडेमध्ये चार वेळा 50+ डाव खेळले. श्रेयसशिवाय संजू सॅमसनने 38 चेंडूत 36 धावांची खेळी केली. तर  वॉशिंग्टन सुंदरने 16 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावांची खेळी केली. 
 
Edited By - Priya Dixit