शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (18:20 IST)

भारतीय संघाने श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव करत मालिका जिंकली

बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला.मोहाली नंतर भारताने बंगळुरू मध्ये ही लंका दहन केले. कर्णधार रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला या मालिकेतून सुरुवात केली आणि त्यांना दोन्ही कसोटीत यश मिळाले. श्रीलंकेसमोर 447 धावांचे लक्ष्य होते, भारताने श्रीलंकेचा 230 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून दुसरा कसोटी सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही क्लीन स्वीप केला आहे. मायदेशात भारतीय संघाचा हा सलग 15 वा मालिका विजय आहे. भारताच्या 447 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ केवळ 210 धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला. 
 
 भारताच्या विजयात आर अश्विनने 4 आणि जसप्रीत बुमराहने 3 बळी घेतले. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाच्या खात्यात 2 विकेट आल्या.
 
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार दिमुथ करुणारत्ने (107) याने श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याचवेळी संघाच्या सात खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही पार करता आली नाही. तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना पहिल्या डावात 252 धावा केल्या होत्या आणि श्रीलंकेचा पहिल्या डावात 109 धावा झाल्या होत्या. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 303/9 धावा केल्या होत्या.
 
घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 15वा कसोटी मालिका विजय आहे. भारताने नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्धची शेवटची मायदेशात कसोटी मालिका गमावली होती. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी संघाचे कर्णधार होते. त्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. आजपर्यंत कोणत्याही संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर इतक्या मालिका जिंकल्या नाहीत.