शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated :बंगळुरु , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (12:10 IST)

कोहली सोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते लाइव्ह मॅचदरम्यान उतरले मैदानात

virat fans
भारत विरुद्ध श्रीलंकेचा दुसरा डाव सुरु असताना आठव्या षटकात त्यावेळी मोहम्मद शमीचा चेंडू लागल्याने कुसाल मेंडिस उपचार घेत होता. तेव्हा स्टार खेळाडू विराट कोहलीला जवळून पाहण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तीन प्रेक्षक मैदानात घुसले.मैदानात घुसलेल्यापैकी एक प्रेक्षक विराट कोहलीच्या जवळ पोहचण्यात यशस्वी झाला. तेव्हा विराट कोहली स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. जवळ पोहचलेल्या चाहत्याने आणि विराट कोहलीला सेल्फी घेण्यास विनंती केली. त्यानंतर विराट कोहली सेल्फी घेण्यासाठी तयार  झाला, तेव्हा या चाहत्याचा आनंद गगनात मावेना. सेल्फी घेतल्यानंतर सुरक्षारक्षकाने त्या चाहत्याला मैदानातून बाहेर काढले.
 
 सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने पहिल्या डावात ( India first innings ) 252 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 109 धावा करू शकला होता. यानंतर टीम इंडियाने 9 विकेट्सवर 303 धावा करून दुसरा डाव घोषित केला.