IND vs ENG, 2nd Test : भारताने दुसरा कसोटी सामना 317 धावांनी जिंकला
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. दुसर्याा कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केले. इंग्लंडविरुद्ध जिंकण्यासाठी भारताने 482 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसर्याू डावात 286 धावा करून टीम इंडिया ऑलआऊट झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंड 134 धावांवर बाद झाला. भारताच्या या विजयानंतर चार कसोटी सामन्यांची मालिका आता 1-1 अशी झाली आहे.