मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

आयसीसी वन-डे क्रिकेट क्रमवारीत भारतीय अव्वल

आयसीसीच्या वन-डे क्रिकेट क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी पहिला क्रमांक पटकावला आहे. कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या वन-डे जागतिक क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सला मागे टाकत विराट कोहलीने पहिलं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीचा त्याला क्रमवारीत पहिलं स्थान मिळवून देण्यात उपयोग झाला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकरने फलंदाजांच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. 
 
तर दुसरीकडे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजही महिलांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. ७५३ गुणांसह मिताली राजने क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे.