शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (12:29 IST)

आयपीएल जिंकण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावणार

आयपीएलच्या 2020 हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकात्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. मात्र लिलावाआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याने एक मोठे वक्तव्य केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ही मानाची स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही. त्यामुळेच यंदाच्या हंगामामध्ये विशेष तयारी करुन बंगळुरुचा संघ मैदानात उतरणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत. त्याचबरोबर ही स्पर्धा जिंकणसाठीच पूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे म्हटले आहे.
 
आरसीबीच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विराटने आरसीबीच्या चाहत्यांना हा संदेश दिला आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, तुम्हाला सर्वांना ठावूक आहेच की लवकरच आयपीएलचा लिलाव होणार आहे. तुम्ही सर्वांनी आरसीबीच्या पाठीशी उभे राहावे, अशी माझी इच्छा आहे. संघ व्यवस्थापन, माइक हेसन, सायमन कॅट्रीच खूप चांगले काम करत आहेत. यंदाच्या हंगामामध्ये संघ कशापद्धतीचा असावा, त्यामध्ये कोण असावे कोण नाही याबद्दल आमची बरीच चर्चा झाली आहे. आमची कोअर टीम आहे तशीच ठेवणार आहोत. मी तुम्हाला हे सर्व आश्वासन देऊ इच्छितो की, ज्या ठिकाणी आम्ही कमी पडत आहोत. त्यामध्ये आम्ही नक्कीच सुधारणा करु. आम्ही एक मजबूत संघ बनवणार आहोत. यामुळे आम्हाला 2020 चा हंगाम छान जाईल, अशी आशा विराटने या व्हिडिओमध्ये बोलताना व्यक्त केली केली आहे.
 
आमच्या सर्व चाहत्यांनी संघाच्या पाठीशी उभे राहावे. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी मोलाचा आहे आणि जोपर्यंत आम्ही क्रिकेट खेळत राहू तोपर्यंत आम्हाला तो महत्त्वाचा असणार आहे. तुम्हा सर्वांचे आभार. मी यंदाच्या आयपीएल लिलावासाठी खूपच उत्सुक आहे. पाहुयात आता 19 डिसेंबरला नक्की काय होते, असेही विराट या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. विराटने आतार्पंत आयपीएलमध्ये 5 हजार 412 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट सध्या पहिल्या स्थानी आहे. दुसर्‍या क्रमांकावर चेन्नई सुपरकिंग्जचा सुरेश रैना आहे. रैनाने 193 सामन्यांमध्ये 5 हजार 368 धावा केल आहेत.