शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (15:07 IST)

जेसन होल्डरने इतिहास रचला; T20I मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला वेस्ट इंडिजचा गोलंदाज ठरला

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने रविवारी रात्री बार्बाडोसमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक घेत इतिहास रचला. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक घेणारा होल्डर हा वेस्ट इंडिजचा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने 4 चेंडूत सलग 4 विकेट घेत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या सामन्यात इंग्लंडला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या विजयासह वेस्ट इंडिजने 5 सामन्यांची T20I मालिका 3-2 ने जिंकली. 30 वर्षीय होल्डरने या सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 27 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतल्या. 
 
कॅरेबियन अष्टपैलू होल्डरने ख्रिस जॉर्डन (7), आदिल रशीद (0) आणि शकीब महमूद (0) यांना बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. याशिवाय त्याने सॅम बिलिंग्ज (41) आणि कर्णधार मोईन अली (14) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून सामन्यात आपला पंजा उघडला. अखेरच्या षटकात त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली. होल्डरने पाच सामन्यांच्या मालिकेत 9.6 च्या सरासरीने पाच डावात एकूण 15 बळी घेतले आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कारासाठी निवडण्यात आले. 
 
यासह होल्डर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 चेंडूत 4 बळी घेणारा जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर रशीद खानने 2019 मध्ये डेहराडूनमध्ये आयर्लंडविरुद्ध, 2019 मध्ये पल्लेकल येथे न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि आयर्लंडच्या कुर्टिस कॅम्परने ही कामगिरी केली होती. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध कॉम्परने चार चेंडूंत 4 बळी घेतले होते.