शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (14:24 IST)

रवी बिश्नोईंचा शेतातून पिचपर्यंतचा प्रवास

भारताच्या 21 वर्षाचा लेग स्पिनर रवी बिश्नोईंची प्रथमच टीम इंडियाच्या संघात भारत आणि वेस्ट इंडिज वन डेआणि T20 सिरीज साठी निवड झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. रवी विष्णोई ने अंडर -19 वर्ल्ड कप आणि आयपीएल मध्ये पंजाब किंग्स कडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्यासाठी शेतातून पिचपर्यंत चा प्रवास खूपच खडतर होता. 2018 साली रवीच्या 12 वी बोर्ड परीक्षेच्या वेळी आयपीएल हंगाम सुरु होता. रवी राजस्थान मधील जोधपूरच्या एका कुटुंबातील चार भावंडा मधील सर्वात लहान होता. त्याचे स्वप्न होते क्रिकेटपटू होण्याचे. त्याच्या गावात पीच नव्हते .त्याने आपल्या शेतात स्वकष्टाने स्वतःसाठी पीच तयार केले. तिथे तो सराव करत होता. अखेर त्याच्या कष्टाला यश मिळाले आणि त्याला राजस्थान रॉयल्स साठी नेट बॉलिंग करण्याची संधी मिळाली. लहानपणी रवी मैदानात गोलंदाजी करायचा नंतर जोधपूर क्रिकेट अकादमी मध्ये गेला.त्याची निवड राजस्थान रॉयल्स टीम मध्ये नेट बॉलर म्हणून निवड झाली. आता भारत आणि वेस्ट इंडिज वन डे आणि T20 सिरीज साठी त्याची निवड झाली आहे.