शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बंगळुरू , बुधवार, 11 मार्च 2020 (15:51 IST)

आयपीएलवर बंदी घालणची कर्नाटक सरकारची मागणी

कोरोनामुळे आयपीएलचे महाराष्ट्रामध्ये सामने होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. पण आता कर्नाटक सरकारने आयपीएलवर बंदी घालावी किंवा पुढे ढकलावी, अशी मागणी थेट केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली तर बंगळुरूमध्ये सामने होणार नाहीत. जर बंगळुरूमध्ये सामने होऊ शकले नाहीत, तर हा कर्णधार विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) यांना मोठा धक्का   असेल.
 
त्यामुळे कोहलीच्या आरसीबी संघापुढे आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक संघाचे एक होम ग्राउंड असते. या होम ग्राउंडवर संघाला चांगलाच पाठिंबा मिळतो, त्याचबरोबर होम ग्राउंडवर संघाच्या विजयाची सरासरीही जास्त असल्याच पाहायला मिळते. पण जर आता कर्नाटकमध्ये सामने झाले नाही तर आरसीबीचे सामने बंगळुरूला होणार नाहीत. त्यामुळे एक तरत्यांना दुसरे होम ग्राउंड शोधावे लागेल किंवा आयपीएल पुढे ढकलण्याची विनंती बीसीसीआयला करवी लागेल. कोरोना वायरसचे सावट सध्याच्या घडीला जगभरात पसरले आहे. त्यामुळे या गोष्टीचा फटका आता भारताधील गर्भश्रीमंत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगलाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना वायरसमुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
 
जर आयपीएल पुढे ढकलली तर बीसीसीआयला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे. 'कोरोना' वायरसुळे आयपीएल पुढे ढकला, असे मत महाराष्ट्राच आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केले होते.