मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 11 मार्च 2020 (10:03 IST)

‘Realme Band’ ची पहिल्यांदा विक्री

रिअलमी कंपनीचा लेटेस्ट फिटनेस बँड ‘Realme Band’ ची पहिल्यांदा विक्री होत आहे. या बँडच्या विक्रीसाठी कंपनीकडून ई-कॉमर्स संकेतस्थळ एमेझॉन आणि realme.com वर सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
कंपनीचा पहिला स्मार्ट बँड असून यामध्ये 2.4cm चा कलर डिस्प्ले आहे. नऊ स्पोर्ट्स मोड असलेल्या या बँडमध्ये पाच स्टायलिश डायल फेस मिळतील. तसेच क्रिकेट मोडचाही समावेश यामध्ये आहे. याशिवाय, बँडमध्ये पाणी पिण्याची आठवण देणारे वॉटर रिमाइंड, हार्ट रेट मॉनिटर, स्मार्ट नोटिफिकेशन, स्लीप मॉनिटरिंग हे फीचर मिळतील. या बँडला वॉटरप्रूफ आणि डस्टसाठी IP68 रेटिंग मिळाले आहे, म्हणजेच हा बँड वॉटरप्रूफ असून चार्जिंगसाठी युएसबी पोर्ट किंवा अॅडप्टरच्या मदतीने चार्जिग करता येईल.
 
रिअलमीने या फिटनेस बँडची किंमत 1,499 रुपये ठेवली आहे. तर, एचएसबीसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे हा बँड खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल. बँडच्या खरेदीसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे. याशिवाय, एचएसबीसीच्या कॅशबॅक कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट आणि ‘एमेझॉन पे’द्वारे पेमेंट केल्यास 50 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे. हा बँड ब्लॅक, ग्रीन आणि येलो अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.