KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना सात वाजता नाही तर या वेळी सुरू होईल
आयपीएल 2025 सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही आणि गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली त्यांच्या जेतेपदाच्या बचावाची सुरुवात करण्यास सज्ज आहे. पहिल्या सामन्यात, केकेआरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे आव्हान असेल, जे कोलकाताप्रमाणे नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळेल.
गेल्या हंगामात केकेआरने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला हरवून विजेतेपद पटकावले होते. रहाणेसमोर जेतेपद राखण्याचे आव्हान असेल तर पाटीदारकडे जे करण्याची संधी आहे ते त्याच्या आधी कोणत्याही आरसीबी कर्णधाराला करता आले नाही.
केकेआर आणि आरसीबी यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना 22 मार्च रोजी शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवरभारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्ध्या तासापूर्वी 7 वाजता होईल.
केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल ड्रीम11 संघ
फिल साल्ट (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, टिम डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल पंड्या, सुनील नारायण, आंद्रे रसेल, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, वरुण चक्रवर्ती.
Edited By - Priya Dixit