शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (09:43 IST)

MI vs CSK:चेन्नई'सुपर किंग्स'ने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला,ऋतुराज ठरला विजयी शिल्पकार

आयपीएल 2021 च्या 30 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऋतूराज गायकवाडने CSK संघासाठी शानदार फलंदाजी केली. तो 58 चेंडूत 88 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय ड्वेन ब्राव्होने आठ चेंडूत 23 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 136 धावा करू शकला. सौरभ तिवारीने मुंबईसाठी सर्वाधिक 50 धावा केल्या आणि नाबाद राहिला. 
 
या विजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. संघाने आठ पैकी सहा सामने जिंकले आहेत आणि त्याचे 12 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सचेही समान गुण आहेत, परंतु ते नेट रन रेटमध्ये चेन्नईच्या मागे आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि मुंबई 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
 
नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या चेन्नई संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने फाफ डू प्लेसिसला शून्यावर बाद करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. चेन्नई अजून या धक्क्यातून सावरला नव्हता की पुढच्याच षटकात अॅडम मिलनने मोईन अलीला शून्यावर बाद केले. 
 
तिसऱ्या षटकात बोल्टने सुरेश रैनाला (4) बाद केले आणि चेन्नईला मागच्या पायावर ढकलले. त्यानंतर मिलने कर्णधार धोनीच्या (3) रूपाने मुंबईला चौथे यश मिळवून दिले. पॉवर प्ले होईपर्यंत चेन्नईची धावसंख्या 4 गडी गमावून 24 धावा होती.
 
अंबाती रायडू निवृत्त-दुखापतग्रस्त झाला आणि ड्रेसिंग रूममध्ये परतला जेव्हा अॅडम मिल्ने CSK च्या डावाच्या दुसऱ्या षटकात कोपरवर झालेल्या दुखापती नंतर तो फलंदाजीसाठी मैदानावर परतला नाही. 
चार विकेट पडल्यानंतर ऋतूराज आणि जडेजा यांनी शानदार फलंदाजी केली
,ऋतूराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी 64 चेंडूत 81 धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने 17 व्या षटकात जडेजाला बाद करत ही भागीदारी तोडली. जडेजा 33 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. 
 
जडेजा बाद झाल्यावर ब्राव्हो फलंदाजीसाठी आला. त्याने गायकवाडसह 16 चेंडूत 39 धावा जोडल्या. ब्राव्होने अवघ्या सात चेंडूत 23 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याने आपल्या डावात सलग तीन षटकार ठोकले. 
 
88 धावांवर नाबाद राहिलेल्या गायकवाडने ही शानदार फलंदाजी केली. त्याने 58 चेंडूत नाबाद 88 धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये हे त्याचे सलग सहावे आणि यूएईमधील सलग चौथे अर्धशतक होते. शेवटच्या पाच षटकांत सीएसकेने दोन गडी गमावून 69 धावा केल्या. मुंबईकडून बोल्ट, बुमराह आणि मिल्ने ने  प्रत्येकी दोन बळी घेतले.
मुंबई संघाची सुरुवात खराब झाली  
 
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही खराब झाली. 37 धावांनी संघाने सलामीवीर आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या विकेट गमावल्या होत्या. वेगवान गोलंदाज दीपक चहरने मुंबईला पहिले दोन धक्के दिले. क्विंटन डी कॉक 17 धावा, अनमोलप्रीत सिंग 16 धावा आणि सूर्यकुमार 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर इशान किशनही 11 धावा करून बाद झाला. कर्णधार पोलार्ड फक्त 15 धावा करू शकला
 
मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हा सामना खेळत नव्हता. त्याचबरोबर बुमराहचा हा 100 वा सामना होता.आता मुंबई 23 सप्टेंबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि 24 सप्टेंबर रोजी चेन्नई रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्याशी लढेल.
 
चेन्नई प्लेइंग इलेव्हन: एमएस धोनी (W/c), फाफ डुप्लेसिस,ऋतुराज गायकवाड,मोईन अली,सुरेश रैना,अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा,ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर,दीपक चाहर,जोश हेजलवूड
 
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: किरोन पोलार्ड ( c), इशान किशन, क्विंटन डी कॉक (w), अनमोलप्रीत सिंग, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पंड्या, अॅडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.