बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (21:54 IST)

कोरोना हरणार, भारत जिंकणार!, क्रिकेटपटूंनी दिला संदेश

लॉकडाऊनमुळे सगळ्याच क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे किंवा पुढे ढकलल्या गेल्यामुळे खेळाडू घरामध्येच आहेत. मुंबईचे क्रिकेटपटूंनी घरबसल्या नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.  
 
कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरीच राहणं आपल्या कुटुंबाच्या आणि सगळ्यांच्याच हिताचं आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा, स्वतःसोबत, आपल्या प्रियजनांसोबत आनंदाने घरीच राहा! आपले छंद जोपासा! नियमिय व्यायाम, योगा करा! लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कोरोना हरणार, भारत जिंकणार!, असा संदेश क्रिकेटपटूंनी दिला आहे. 
 
अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर, आदित्य तरे, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, सिद्धेश लाड, सरफराज खान या खेळाडूंनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला हे आवाहन केलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स काऊन्सिल सदस्य श्री अजिंक्य एस. नाईक यांच्या सहकार्यातून जनजागृतीचा हा प्रयत्न करण्यात आला आहे.