सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (13:18 IST)

Video कॅच सोडल्याच्या रागातून पाक गोलंदाजांने खेळाडूच्या कानाखाली लगावली

पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच आपल्या विरुद्ध खेळासाठी ओळखला जातो. मॅच फिक्सिंगपासून ते मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंचे हिंसक वर्तन सामान्य आहे. ताजे प्रकरण देखील असेच आहे जिथे एका खेळाडूने सामन्याच्या दरम्यान आपल्याच संघाच्या खेळाडूला थप्पड मारली.
 
पाकिस्तान सुपर लीगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाहोर कलंदरचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ सामन्यादरम्यान त्याचा सहकारी खेळाडू कामरान गुलामला थप्पड मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या या वागण्यावर बरीच टीका होत आहे. केवळ पाकिस्तानातीलच नाही तर इतर देशांतील क्रिकेट चाहतेही यावेळी प्रचंड नाराज आहेत.
 
हरिस रौफने का मारली थप्पड?
आता मोठा प्रश्न असा आहे की मॅचदरम्यान असे काय घडले की हरिसला कामरानला थप्पड मारावी लागली. वास्तविक, काही वेळापूर्वी कामरान गुलामने पेशावर झल्मीचा सलामीवीर हजरतुल्ला जझाईचा कॅच सोडला होता. त्यामुळे गोलंदाज इतका संतापला की त्याला भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.
 
...आणि सेलिब्रेशन करायला आलेल्या कामरानला थप्पड मारली
षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हरिस रौफने मोहम्मद हरिसला बाद केले. यानंतर जेव्हा कामरानसह सर्व खेळाडू सेलिब्रेशन करायला आले. कामरान रौफजवळ येताच त्याने त्याला चापट मारली. मात्र, त्यानंतर कामरानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर हारिस रौफला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
 
हरिस रौफच्या वागण्यावर सोशल मीडियावर टीका होत असून चाहते सतत त्याच्यावर कमेंट करत आहेत.