1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:56 IST)

मासे खाणाऱ्यांच्या आरोग्याला धोका, नदीत ब्लिचिंग पावडर टाकून मासेमारी

Danger to the health of fish eaters
कोल्हापुरच्या पंचगंगा नदीत हा जीवघेणा प्रकार सुरू आहे. नदीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून मासे पकडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. त्यामुळे नदीतील जीवसृष्टी संकटात आली आहेच, पण हे मासे खाणाऱ्यांनाही धोका निर्माण झालाय. 
 
नद्यांमध्ये अत्यंत घातक पद्धतीनं मासेमारी सुरू असल्याचं समोर आलंय. नदीत ब्लिचिंग पावडर टाकून मासे पकडले जातायत. यामुळे नदीमधील जीवसृष्टी संकटात आली आहेच, पण हे मासे खाल्ल्यानं माणसांच्या आरोग्यालाही धोका होऊ शकतो. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत हा जीवघेणा प्रकार सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय.