छातीत दुखू लागल्याने नितेश राणे कोल्हापूरला दाखल
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. यामुळे राणेंचा कोठडीमधील मुक्काम वाढण्याबरोबरच त्यांना छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळला. संतोष परब हल्ल्याप्रकरणी गोट्या सावंत संशयित आरोपी आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी गोट्या सावंत यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जामीन अर्ज फेटाळला असला तरी गोट्या सावंत यांना अटकेपासून १० दिवसांच संरक्षण दिलं आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, मात्र त्यांना या कालावधीत स्वतः दिवाणी न्यायालयात हजर व्हावं लागेल, असं न्यायालयाने स्पष्ट केल्याची माहिती त्यांचे वकील वकील राजेंद्र रावराणे यांनी दिलीय.