सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (19:05 IST)

नितेश राणेंची प्रकृती बिघडली, कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल

भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखत होते. तसेच त्यांच्या मणक्यात तीव्र वेदना होत असल्याचा तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. 
सध्या भाजपचे आमदार नितेश राणे हे शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या जामिनावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. नितेश यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी या साठी वैद्यकीय पथक सतत त्यांच्यावर विशेष लक्ष देत आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यावरच त्यांच्यावर काय औषधोपचार करायचे हा निर्णय घेण्यात येईल. 

 सध्या त्यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय पथक लक्ष देऊन आहे. त्यांना छातीत दुखत होते आणि मणक्यात वेदना जाणवत होत्या. तसेच त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्यावर कोल्हापूर रुग्णालयात उपचार सुरु आहे.पुढील औषधोपचाराचे निर्णय त्यांच्या वैद्यकीय तपासणी केल्यावर घेण्यात येणार आहे. नितेश राणे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्यांच्या जामिनावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी त्यांची तब्बेत बिघडली आणि त्यांना कोल्हापुरात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.