गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:36 IST)

शिर्डी,औरंगाबाद, कोल्हापूर विमानतळे या नावाने ओळखली जाणार !

गेल्या काही दिवसांपासून मागणी होत असलेल्या राज्यातील तीन विमानतळांचं नामकरण करण्याच्या हालचालींना वेग आलं असून, लवकरच या विमानतळाचं नामकरण होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रीराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. तसंच देशातील एकूण १३विमानतळाच नामकरण होणार असल्याचं सुद्धा कराड म्हणाले.औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी आले असता कराड माध्यमांशी बोलताना सांगितले आहे . 
महाराष्ट्रातील औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज, शिर्डीच्या विमानतळाला साईबाबा आणि कोल्हापूरच्या विमानतळाचे महालक्ष्मी विमानतळ असं नामकरण लवकरच केली जाणार असल्याचं भागवत कराड म्हणाले. तसच औरंगाबाद, शिर्डी, कोल्हापूरसह देशातील 13 विमानतळांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचं भागवत कराड यांनी सांगितलं.तर औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करण्याच्या मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.