मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (10:16 IST)

औरंगाबाद मधील क्रांती चौकात मध्यरात्री बॅनर हटवल्याने शिवप्रेमी आक्रमक

महापालिकेने काल रात्री शहरातील शिवप्रेमींचे बॅनर काढून टाकले त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12  वाजता करण्यात येणार आहे. 
 
कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन हजेरी लावतील तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्वाधिक उंचीचे शिवछत्रपतींचे शिल्प क्रांती चौकात असून ते पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे यांनी घडविले आहे. चबुतरा व परिसराचे सौंदर्यीकरण महापालिकेने केले आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी कळविले आहे.
 
दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री शिवप्रेमींचे बॅनर काढून टाकल्याने काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. महापालिकेकडून बॅनर हटवण्यात आले तेव्हा अनेक शिवप्रेमी घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला मात्र, पोलिसांना स्थिती सांभाळत घटनास्थळ गाठून शिवप्रेमींना पांगवले. रात्रभर येथे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.