मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (10:46 IST)

PAK vs ENG: T20 विश्वचषक फायनल आज इंग्लंड आणि पाकिस्तान मध्ये,कोण बनणार दुसऱ्यांदा T20 विश्वचषक चॅम्पियन?

PAK vs ENG: T20 World Cup final  England and Pakistan  PAK vs ENG T20 World Cup Final 2022 Cricket News In Marathi
PAK vs ENG T20 World Cup Final 2022: तीस वर्षांपूर्वी ज्या मैदानावर आमनेसामने झाली होती त्याच मैदानावर रविवारी आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. 25 मार्च 1992 रोजी, त्यावेळी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता. यावेळी 13 नोव्हेंबरला टी-20 विजेतेपदाचा सामना आहे. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ग्रॅहम गूचच्या संघ इंग्लंडचा 22 धावांनी पराभव करून पहिले विश्वविजेतेपद पटकावले. यावेळी, इंग्लंड किंवा पाकिस्तान कोणताही संघ जिंकेल, त्यांचे हे तिसरे विश्वविजेतेपद असेल. यापूर्वी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक वनडे आणि एक टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
 
अखेरच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने जबरदस्त पुनरागमन केले. तसेच दक्षिण आफ्रिकेवर नेदरलँड्सने मिळवलेल्या विजयामुळे नशिबाच्या जोरावर बाद फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानने संधीचा फायदा उठवला आहे. इंग्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले पाकिस्तानचे संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
 
संघांचे संभाव्य प्लेइंग-11
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह.
 
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार, यष्टिरक्षक), अॅलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद.
 
 
Edited By - Priya Dixit