रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2024 (09:45 IST)

आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर पाच धावांनी विजय

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर RCB आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला गेला. मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 136 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, आरसीबीने हा सामना पाच धावांनी जिंकला.

महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मंधानाच्या सैन्याने एमआयचा पाच धावांनी पराभव केला. आता अंतिम फेरीत (17 मार्च) संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मेग लॅनिंगच्या संघाने गुजरातविरुद्ध विजयाची नोंद करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आरसीबी आणि एमआय यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्मृतीमंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एलिस पेरीच्या अर्धशतकामुळे संघाने 20 षटकांत सहा गडी गमावून 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 130 धावा करता आल्या. यासह आरसीबीने हा सामना पाच धावांनी जिंकला.
 
Edited By- Priya Dixit