1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (11:26 IST)

मराठमोळ्या शैलीत सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Sachin Tendulkar
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात महाराष्ट्र दिन आज साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक खास फोटो शेअर करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 
सचिन तेंडुलकरने या फोटोमध्ये महाराष्ट्राची ओळख असलेला मराठमोळ्या पद्धतीचा फेटा बांधला आहे. तो खास फोटो ट्विट करत त्याने सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
‘आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!’, असा संदेश त्याने फोटोसोबत लिहिला आहे. तसेच त्याने त्याच्या ट्विटमध्ये #MaharashtraDay हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.