शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 11 जुलै 2017 (09:34 IST)

कोहलीशी चर्चा झाल्यानंतर ठरणार भारतीय संघाचा प्रशिक्षक – गांगुली

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची आज दिवसभरात रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या मुलाखती पार पडल्या, मात्र ही घोषणा लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती सौरव गांगुलीने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
 
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर संघाचा प्रशिक्षक ठरविण्यात येईल, अशी माहिती यावेळी गांगुलींने दिली आहे. श्रीलंका दौरा एवढंच आमच्या डोळ्यासमोर नाही. त्यामुळे प्रशिक्षक निवडीसाठी आम्हाला आणखी वेळ हवा आहे. तसेच बऱ्याच जणांशी चर्चाही बाकी असल्याचेही तो म्हणाला.