शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 6 जुलै 2019 (15:30 IST)

महेंद्र सिंह (MS) धोनीचे कर्णधार पदाबद्दलच्या काही रोचक गोष्टी :

- धोनी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे तसेच T-२० चे कर्णधार होते.
- महेंद्र सिंह धोनी आजपर्यंत क्रिकेट इतिहासात एकदिवसीय क्रिकेट संघाचे एक यशस्वी कर्णधार मानले जातात.
- MS धोनी कर्णधार असताना भारताने पहिले ICC T -२० विश्वचषक (worldcup) २००७ मध्ये आपल्या नावी केला.
- MS धोनी ने त्याच्या कर्णधार कालावधीत श्रीलंका व न्यूझीलंड मध्ये प्रथम ODI सिरीज मध्ये विजय प्राप्त केले.
- MS धोनी लगातार सात वर्ष (२००८-२०१३) पर्यंत ICC World One Day Eleven मध्ये सहभागी झाले आहेत.
- MS धोनी कर्णधार असतानाच तब्बल २८ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने ODI World Cup २०११ पुन्हा एकदा आपल्या नावी केला.
- सन २०१३ मध्ये प्रथमच भारताने Champions Trophy देखील पटकावली.
- MS धोनी जगातील पहिले असे कर्णधार आहे ज्यांचे नाव ICC च्या सर्व चषकांवर (CUP आणि Trophy) वर आहे.
- MS धोनी भारताचे एकमेव असे कर्णधार आहे ज्याने भारताला १०० हून अधिक ODI सामने जिंकले आहेत.
- MS धोनी IPL च्या प्रथम सामन्यातील सर्वात महाग खेळाडू होते ज्याने CSK सोबत १.५ दशलक्ष डॉलर मध्ये करार केला होता.
- MS धोनी एकमेव असे कर्णधार आहे जो ODI सामन्यात ७ व्या क्रमांकावर खेळून देखील सामन्यांमध्ये शतक पटकावले. हे त्यांनी २०१२ मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध केले होते.
- MS धोनी कर्णधार रुपात सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे तसेच जास्त क्रिकेट सामने जिंकवून देण्यात येणाऱ्या कर्णधार मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.