मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 6 जुलै 2020 (11:57 IST)

स्टोक्स काही प्राणात कोहलीसारखाच : हुसेन

इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने बेन स्टोक्सच्या नेतृत्वक्षमतेची तुलना भारतीय कर्णधार विराट कोहलीशी करताना सांगितले की, हा अष्टपैलू खेळाडू जो रूटच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व सांभाळताना महान कर्णधार सिध्द होईल. कारण तो जे काही योगदान देतो तो कोहलीप्रमाणचे शंभर टक्के देतो, असेही हुसेन म्हणाला.
 
आठ जुलैपासून वेस्ट इंडीजविरूध्द साउदम्पटनमध्ये सुरू होणार्याज पहिल्या कसोटीत विश्वचषकातील हिरो स्टोक्सला मंगळवारी इंग्लंडचा कर्णधार म्हणून जाहीर करणत आले. रूट आपल्या पत्नीच्या बाळंतपणामुळे हॉस्पिटलमध्ये थांबण्यासाठी सुट्टीवर असणार आहे. इंग्लंडमध्ये जैव सुरक्षित वातावरणात ही कसोटी मालिका सुरू होईल.
 
या माध्यमातून कोरोनामुळे ठप्प असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही पुन्हा सुरूवात होईल. हुसेन स्टोक्सबाबत बोलताना म्हणाला की, साधारणपणे बेन जे काही करतो ते थोडंफार विराट कोहली याच्यासारखेच आहे. तो आपले शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला वाटतेकी, तो महान कर्णधार सिध्द होईल. सध्या तो कार्यवाहक कर्णधार आहे. शिवाय तो जो रूट प्रतीही प्रामाणिक आहे. इंग्लंडकडून 96 कसोटी खेळलेल्या रूटने सांगितले की, एक अष्टपैलू खेळाडू असल्याकारणाने त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तो तिन्ही प्रकारात खेळतो. आयपीएल होण्याचीही शक्यता आहे. मला वाटते की, स्टोक्सला कमी समजणे धोक्याचे आहे. त्याच्यामध्ये पूर्णवेळचा कर्णधार बनण्याची क्षमता आहे. मी मात्र त्याच्यावर भविष्यात येणार्याक जबाबदारीमुळे थोडासा चिंतेत आहे.