गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई, , शनिवार, 26 मे 2018 (11:16 IST)

धोनीसाठी आयपीएल स्पर्धा जिंकावाची आहे : रैना

अकरावी आयपीएल स्पर्धा ही कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी आम्हाला जिंकावायची आहे आणि ती जिंकणारच, असा विश्वास चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा फलंदाज सुरेश रैना याने व्यक्त केला आहे.
 
आयपीएलचा शेवटचा टप्पा खेळला जात आहे. चेन्नईने पहिल प्ले ऑफ सामन्यात हैदराबादचा दोन गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. रविवारी वानखेडे स्टेडिमवर कोलकाता व हैदराबाद संघातील विजेत्याशी आमचा सामना होत आहे. या अंतिम सामन्यापूर्वी रैना हा बोलत होता. चेन्नई संघाने दोन वर्षाच्या बंदीनंतर या आयपीएलमध्ये सहभाग घेतला आहे. चेन्नई संघ यापूर्वी दोनवेळा विजेता ठरलेला संघ आहे. चेन्नईने अकरा  स्पर्धेत सातव्यावेळी अंतिम फेरी गाठली आहे.
 
यावरून चेन्नई संघ हा प्रबळ असा संघ आहे. या संघाच्या यशाचे बरेच श्रेय कर्णधार धोनीला जाते. त्याने या हंगामात जबरदस्त अशी फलंदाजी केली आहे. फलंदाजीत बढती घेऊन त्याने संघाला विजयी केले आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हे विजेतेपद मिळविण्याची आमची इच्छा आहे, असे रैनाने सांगितले.
 
धोनीने चेन्नई संघाची बरीच काळजी घेतली आहे. 2008 पासून धोनीने चेन्नई संघासाठीआर्श्चकारक खेळ केला आहे. 31 वर्षाच्या रैनाने ही स्पर्धा जिंकू, असा विश्वासही व्यक्त केला आहे. काहीवेळा भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते; परंतु यावेळी मात्र आम्ही निश्चितपणे धोनीसाठी विशेष कामगिरी करू, असेही तो म्हणाला.
 
अनुभवी शेन वॅटसन आणि अंबाटी राडू हे दोघेही फॉर्ममध्ये आहेत. त्याचप्रमाणे अमाचे ट्युनिटस्‌ चांगले आहे. आमच्या संघातील खेळाडूही उत्तम आहेत. अनुभवाच्या जोरावर आयपीएलची ट्रॉफी मिळवू, असे शेवटी तो म्हणाला.