सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (09:28 IST)

टीम इंडिया वनडेतही नंबर १

कसोटीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय प्रकारातही अव्वल स्थान मिळवले आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईसनुसार ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला होता.
 
तर काल कोलकातामध्ये ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ५० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. कसोटीतही भारतीय संघ १२५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे . आता भारतीय संघाने एकदिवसीय प्रकारातही अव्वल स्थान पटकावले आहे.