बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (08:03 IST)

उपकर्णधार हार्दिक पांड्याचे वडोदरात भव्य स्वागत

Hardik Pandya's Victory Road Show in Vadodara
T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाचा उपकर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सोमवारी त्याच्या मूळ गावी वडोदरा येथे पोहोचला. यादरम्यान, 29 जून रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून टी-20 विश्वचषक जिंकला.आता मुंबईप्रमाणेच वडोदरातही विजयी परेड काढण्यात आली. खुल्या बसमध्ये बसून पंड्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसला.
 
बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने 17 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या विजयासह भारताचा 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 
 
भारताच्या विजयानंतर हार्दिक-कृणालचे वडोदरा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यादरम्यान हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याचाही भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाचा वाटा होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डावातील शेवटचे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने डेव्हिड मिलरला बाद केले, त्यानंतर टीम इंडियाने हा सामना सात धावांनी जिंकला.
 
Edited by - Priya Dixit