शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (15:59 IST)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विनोद कांबळीने अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांना टिप्स दिल्या

भारतीय क्रिकेट संघ या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे, जिथे 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी कसोटी संघातील खेळाडू मुंबईतील एका शिबिरात सहभागी होत असून त्यांनी मालिकेची तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यांना फलंदाजीच्या टिप्स दिल्या. विनोद कांबळीने ट्विटरवर अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांची छायाचित्रे शेअर करून एक खास संदेश लिहिला आहे.
विनोद कांबळीने ट्विटरवर लिहिले की, 'दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी अजिंक्य आणि पंतला प्रशिक्षण देणे खूप छान वाटले. मी दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीबद्दल काही महत्त्वाची माहिती सामायिक केली. दक्षिण आफ्रिका-भारत मालिकेसाठी त्याला शुभेच्छा. क्रिस्टियानोलाही काहीतरी शिकायला मिळाले. क्रिस्टियानो हा विनोद कांबळीचा मुलगा आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बायो बबलमध्ये दाखल झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संघाचे खेळाडू चार्टर्ड विमानाने त्यांच्या कुटुंबियांसह दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होतील. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. त्याच्या जागी रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, मात्र रोहित दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. आता पाहावे लागेल की कसोटी संघाचा उपकर्णधार कोण असणार ?